सुनील केदारांचे सोनिया गांधींना वर्धा येण्याचे निमंत्रण

0
13

नागपूर दिनांक 21 एप्रिल ( प्रतिनिधी)

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची नवी दिल्ली स्थित १० जनपथ येथे भेट घेऊन सोनिया गांधी यांना सेवाग्राम वर्धा येथे येण्याचे निमंत्रण दिले.

सेवाग्राम स्थित चरखा भवन येथील १२ फूट उंचीच्या लाकडी चरख्याची सर्वात मोठा चरखा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने दखल घेतलेल्या चरख्याच्या उद्घाटन समारंभा करिता सुनील केदार यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना निमंत्रण दिले.

या भेटी दरम्यान सुनील केदार यांनी आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळातील संपूर्ण लेखा जोखा  सोनिया गांधी यांचे समोर मांडला. यावेळी सोनिया गांधी यांनी सुद्धा सुनील केदार यांच्या कामावर संतोष व्यक्त केला.

झालेल्या बैठकीत सुनील केदार यांनी पालकमंत्री म्हणून कर्तव्य पार पाडत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण कामाविषयी सोनिया गांधी यांचेशी चर्चा केली. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सेवाग्राम स्थित सर्व सेवा संघाच्या माध्यमातून काँग्रेसी विचारधारेला पुन्हा जनसामान्यांत रुजवून जमिनी स्तरावर काँग्रेस पक्षाला मजबूत करता येईल या बद्दल विस्तृत पणे माहिती सोनिया गांधी यांना दिली.

या बैठकी दरम्यान काँग्रेसच्या पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांनी सुनील केदार यांच्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here