नग्नावस्थेत डोके छाटलेला युवतीचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ

0
6

चंद्रपूर दिनांक 5 एप्रिल (प्रतिनिधी)

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात एका युवती (Young Girl)चा नग्नावस्थेत डोके छाटलेला मृतदेह (Deadbody) सापडल्याने खळबळ उडाली आहे.

भद्रावतीच्या ITI मागील भागात ही घटना उजेडात आली.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. या युवतीचे डोके निर्दयीपणे उडविण्यात आले आहे. युवतीचे डोके शोधण्याचा पोलिस आणि फॉरेन्सिक टीम प्रयत्न करीत आहेत. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी दाखल झाले. युवतीची ओळख पटवण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत. (The headless body of a young woman was found in Chandrapur)

 

भद्रावतीच्या ITI मागील भागात एका तरुणीचा डोके छाटलेला मृतदेह आढळल्याची माहिती भद्रावती पोलिसांनी मिळाली. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी युवतीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षकांनीही घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. घटनेच्या तपासासाठी पोलिस पुरावे शोधत आहेत. दरम्यान, मयत तरुणीची ओळख पटवणे आणि आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here