पालकमंत्री शंभूराज देसाई आज घेणार विविध योजनांचा आढावा 

0
20

वाशिम दिनांक 30 एप्रिल ( प्रतिनिधी)

पालकमंत्री शंभूराज देसाई हे ३० एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे, देसाई हे जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह येथे दुपारी ३:४५ वाजता बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मौजा कौलखेड येथील जलसंपदा विभागाच्या बुडीत क्षेत्रातील पुनर्वसित गावातील शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत बैठक घेतील.

सायंकाळी ४ वाजता जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ या वर्षांचा खर्चाचा व सन २०२२-२३ या वर्षाचे नियोजन या बाबतचा आढावा घेतील. सायंकाळी ४:३० ते ५ वाजता दरम्यान जिल्हा दक्षता समितीची सभा, मातोश्री पांदन रस्ते योजना, पाणी टंचाईबाबत आढावा तसेच जलसंधारण कामांचा सन २०२०-२१ आणि सन २०२१-२२ वर्षाचा आढावा घेतील.

सायंकाळी ५ वाजता खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा घेतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here