२५ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

0
19

वाशिम दिनांक ११ जुलै (प्रतिनिधी) :

जिल्ह्यात १० जुलै रोजी बकरी ईद व त्यानंतरचे दोन दिवस बासीईद व तिवासी ईद हा सण मुस्लीम धर्मीयांकडून साजरा करण्यात येतो. तसेच १३ जुलै रोजी गुरु पुर्णिमेनिमित्त पोहरादेवी येथे संत रामराव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठया प्रमाणात भाविक दर्शनाकरीता येतात.

सद्यस्थितीत जैन धर्मियांचे आचार्य विद्यासागर महाराज शिरपूर (जैन) येथे चातुर्मास निमित्त वास्तव्यास राहणार आहेत. शिरपूर (जैन) येथे चातुर्मासाच्या काळात विविध धार्मीक कार्यक्रम व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्याकरीता मोठया प्रमाणात जैन धर्मीय भाविकांचे जिल्हयात अवागमण राहणार आहे.

तसेच उदयपूर, राजस्थान येथील कन्हैय्यालाल साहु व अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदु तरुणाची कथीत कट्टर मुस्लीम लोकांनी केलेली हत्या.या सर्व घडामोडींचा विचार करता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे यासाठी २५ जुलैपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे.

हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here