वाशिम दिनांक 12 जुलै (प्रतिनिधी)
जिल्ह्यात 12 जुलै 2022 रोजी गेल्या 24 तासात सरासरी 6.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 1 जून 2022 पासून जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 245 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
आज 12 जुलै रोजी सकाळी गेल्या 24 तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढील प्रमाणे आणि कंसात दिलेली पाऊसाची आकडेवारी ही यावर्षीच्या 1 जून 2022 पासूनची आहे. वाशिम तालुका – 6.5 मिमी,( 221.8 ) रिसोड तालुका – 4.8 मिमी (275.8), मालेगाव तालुका – 3मिमी (248.7),मंगरूळपीर तालुका – 5.6 मिमी (264.5), मानोरा तालुका -12.7 मिमी (300.5) आणि कारंजा तालुका -6.6 (177.8) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.मागील वर्षी 12 जुलैपर्यंत जिल्ह्यात 318.8 मिमि पाऊस पडल्याची नोंद आहे.





