वाशिम दि.१४ एप्रिल ( प्रतिनिधी)
महिला व बालकल्याण मंत्री अॅड यशोमती ठाकूर ह्या १५ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
दुपारी २ वाजता शासकीय वाहनाने मानोरा येथे आगमन. मानोरा पंचायत समिती समोर असलेल्या विदर्भ महिला मंडळाला सदिच्छा भेट देतील. दुपारी २.३० वाजता कारखेडा येथे आगमन व राखीव.कारखेडा येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून सायंकाळी ५ वाजता मोटारीने अमरावतीकडे प्रयाण करतील.





