तलावात बुडून चिमुकल्या भाऊ बहिणीचा मृत्यू

0
10

वर्धा दिनांक 4 एप्रिल ( प्रतिनिधी)

तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे दोघेही तलावाजवळ खेळत होते. समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव जवळील जुनापाणी परिसरात ही घटना घडली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात राहणारे पंचभाई यांचे शेडगाव येथील जुनापाणी परिसरात शेत आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिवनी जिल्ह्यातील एका कुटुंबाला शेतीच्या कामासाठी आणले होते. हे कुटुंब (Family) त्यांच्या दोन मुलांसह शेतातील एका घरात राहत असे मुलांचे आई- वडील शेतात काम करत असताना मुले काल सायंकाळच्या सुमारास ५ वर्षीय शीतल शैलेश कुमरे व ३ वर्षीय शिवम शैलेश कुमरे हे दोघे शेतातील परिसरात असलेल्या तलावावर खेळत असताना अचानक दोघेही तलावात बुडाले आहेत.

मात्र, रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न आल्याने त्यांचा शोध आई- वडिलांनी घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह तलावात दिसले आहे. या घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना (police) देण्यात आली. तात्काळ पोलिसांनी घटना स्थळ गाठत पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here