राष्ट्रवादीची युवती प्रमुख कार्यकर्ती निघाली ‘ वाहनचोर’, मित्रांच्या मदतीने चोरल्या 11 गाड्या!

0
12

चंद्रपूर, 16 नोव्हेंबर :(शहर प्रतिनिधी)  कोरोनामुळे (corona) लांबलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे चंद्रपूरमध्ये (chandrapur) मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचा (ncp party worker) धक्कादायक चेहरासमोर आला आहे. या तरुण कार्यकर्तीला आणि तिच्या साथीदारांना  मोपेड चोरीचा प्रकरणात अटक झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती प्रमुख असलेल्या तरुणीला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.वैष्णवी देवतळे (Vaishnavi Devtale) असे या युवती प्रमुख कार्यकर्तीचे नाव आहे. आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ती बाईक चोरी करत असल्याचे उघड झाले आहे.

तिचे दोन साथीदार विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेले वाहन सोडून जाणाऱ्या वाहनावर ही टोळी लक्ष ठेवत असे. नेमकी संधी साधून मोपेड चोरी करत होते. त्यानंतर त्या मोपेडला दूरवर पर्यंत ढकलत नेण्यात येत होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here