३० एप्रिल ला पालकमंत्री घेणार कौलखेड पुनर्वसित गावातील शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत बैठक

0
15

वाशिम दि.२७ एप्रिल ( प्रतिनिधी)

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मौजे कौलखेड येथील जलसंपदा विभागाच्या बुडीत क्षेत्रातील पुनर्वसित गावातील शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई हे ३० एप्रिल रोजी दुपारी ३:४५ वाजता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह येथे बैठक घेणार आहे.

या बैठकीला मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, वाशिमचे जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता आणि लोणारचे तहसीलदार यांची उपस्थिती राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here