वाशिम, दि. 14 एप्रिल (प्रतिनिधी) :
जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात मोठया प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल हा जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. जयंती उत्सवाच्या कालावधीमध्ये जयंती उत्सव शांततेने पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून 14 एप्रिल रोजी जिल्हयातील मद्यविक्रीची परवाना (अनुज्ञप्तीधारक) दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे.
जयंती उत्सवानिमित्त सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था बाधीत राखण्याच्या दृष्टीकोणातून मुंबई दारुबंदी कायदयाअंतर्गत संपुर्ण जिल्हयातील मद्यविक्रीची परवाना दुकाने (अनुज्ञप्ती) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी, वाशिम यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांचे नांवे असलेली अनुज्ञप्ती मुंबई दारुबंदी कायदयाच्या कलमानुसार रद्द करण्यात येईल. असे या आदेशात नमुद केले आहे.






