अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार केंद्रीय इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश

0
8

वर्धा दिनांक 20 एप्रिल (प्रतिनिधी) :

नागपूर जिल्हयातील रामटेक तालुक्यातील खैरीपरसोडा येथील एकलव्य निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील (CBSC) सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षातील अनुशेष भरुन काढण्यासाठी अनुसुचित जमाती व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 6 वी ते 9 वी मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दि.30 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ यांनी केले आहे.

सदर एकलव्य निवासी पब्लीक स्कुल मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या आदिवासी जमाती व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 जुन रोजी सकाळी 11 ते 3 वाजताच्या वेळेत प्रवेशपुर्व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिक्षेस प्रवेश घेण्यासाठी अर्जाचा नमुना एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय, वर्धा किंवा जवळच्या शासकीय अनुदानित आश्रामशळा, आदिवासी मुला –मुलींचे वसतीगृह येथून अर्जाचा नमुना प्राप्त करुन घेऊन संबंधित शाळेत किंवा आदिवासी आश्रम शाळा तसेच आदिवासी विकास कार्यालय येथे सादर करावा.

प्रवेश घेऊ इच्छिणारा विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद अंतर्गत शाळा, खाजगी शाळेतील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी ते 8 वी मध्ये शिकत असलेला असावा. त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लक्ष रुपयापेक्षा कमी असावे. विद्यार्थी अनुसुचित जमाती, आदिम जमातीचा असावा, असे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here