वर्धा दि.13 एप्रिल ( प्रतिनिधी)
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनील केदार दि.18 एप्रिल रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.
दि.18 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून वर्धेकडे प्रयाण करतील. सकाळी 10.15 वाजता सामान्य रुग्णालय, वर्धा येथे आयोजित आरोग्य मेळाव्यास उपस्थिती. सकाळी 10.45 वाजता सेवाग्राम येथे विनोबा विचार यात्रा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता हिंगणघाट तालुक्यातील रोहनखेडा येथे खासदार निधी अंतर्गत झालेल्या विकासकामाचे लोकार्पण व रोहनखेडा येथील गावातील पट्टेवाटप कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 3 वाजता पंचायत समिती वर्धा व दुपारी 4.30 वाजता पंचायत समिती सेलूच्या जिल्हा परिषद सभागृह येथे आयोजित आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता वर्धा येथून नागपूर कडे प्रयाण करतील.






