वर्धा नदीवरील पुलगाव बॅरेजचे जलपुजन

0
11

घरकुल, घरांसाठी पट्टे व शेतकऱ्यांना पाणी याबाबींसाठी प्राधान्याने काम करू

– पालकमंत्री सुनील केदार

समाजकल्याणच्या दोन वस्तीगृहांचे लोकार्पण

 देवळी येथे विविध विकास कामांचे भुमिपूजन

 डिगडोह येथे ग्रामपंचायत भवनचे लोकार्पण

वर्धा, दि. 11 (प्रतिनिधि) : कोरोना काळात जनतेचे आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाठी शासनाने खुप काम केले. जनतेच्या कल्याणासाठी शासन अव्याहतपणे काम करत आहे. जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासोबतच घरकुल आणि घरांसाठी पट्टे मिळवून देणे या बाबींसाठी येत्या काळात प्राधान्याने काम करणार असल्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

देवळी व पुलगाव येथे पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन, उद्घाटन तथा लोकार्पण झाले. त्यावेळी पुलगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार रणजित कांबळे, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, कार्यकारी अभियंता प्रशांत बुब, मनोज चांदुरकर, रमेश सावरकर आदी उपस्थित होते.

शेतकरी तथा सामान्य नागरीकांसाठी काम करण्याला आमचे प्राधान्य आहे. पुलगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पुलगाव बॅरेज उभारण्यात आले आहे. या बॅरेजमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास त्यांना मोबदला उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री श्री.केदार पुढे बोलतांना म्हणाले.

पुलगाव येथे विविध विकास कामांचे पालकमंत्री श्री.केदार यांनी उद्घाटन तथा लोकार्पण केले. निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत वर्धा नदीवर 92 कोटी 58 लाख रूपये खर्चून बॅरेज बांधण्यात आला असून बॅरेजचे जलपुजन त्यांनी केले. या बॅरेजमुळे 15 दशलक्ष घनमिटर इतका पाणीसाठी होणार आहे. बॅरेजमुळे पुलगावसह 13 गावांना पाणी पुरवठा होणार आहे. वैशिष्टपुर्ण निधी अंतर्गत शहरातील 67 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भुमिपूजनही करण्यात आले. समाजकल्याण विभागाच्या पुलगाव येथील मुलांचे व हिवरा (हा) येथील मुलींचे प्रत्येकी 75 विद्यार्थी क्षमतेच्या प्रत्येकी 7 कोटी 46 रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले.

देवळी नगर परिषद क्षेत्रात वैशिष्टपुर्ण निधी अंतर्गत 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. त्यात नाली बांधकाम, रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंट रस्ता बांधकाम, पुतळ्याचे सौदर्यीकरण आदी कामांचा समावेश आहे. देवळी तालुक्यातील डिगडोह येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनचे लोकार्पण करण्यात आले. डिगडोह ते नांदोरा या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत डिगडोह ते नागझरी या रस्त्याच्या दर्जोन्नती कामाचे भुमिपूजनही पालकमंत्री श्री,केदार यांच्याहस्ते झाले.

पुलगाव येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्र्यांसह आ.रणजित कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे फार मोठे काम आहे. पुलगाव बॅरेज हा त्यासाठी बांधण्यात आला असून वर्धा नदीवर अजुनही काही बॅरेज होत असल्याचे ते म्हणाले. समाजकल्याणचे उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, रमेश सावरकर यांचीही यावेळी भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here