वाशिम दि. 06 (प्रतिनिधी) :
दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या 64 व्या नँशनल पिस्टल शूटिंग स्पर्धेमध्ये वाशिम येथील शासकीय तंत्र अभियांत्रिकी विद्यालयाची द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी सोनल चव्हाण हिने दिल्ली येथे राष्ट्रीय पिस्टल शुटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून 600 गुणांपैकी 528 गुण घेऊन या स्पर्धेत प्राविण्यासह यश संपादन केल्याने तिची इंडिया ट्रायलमध्ये निवड झाली
आज 6 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी एस. षण्मुगराजन यांचे हस्ते त्यांच्या दालनात सोनल चव्हाण हिचा सत्कार करून तिला इंडिया ट्रायलमध्ये यश संपादन करण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोनलचे वडील महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम चव्हाण, आई संध्या चव्हाण, बहीण मनु चव्हाण व सुधाकर राठोड हे उपस्थित होते.






