मारवाडी युवा मंचाच्या नवीन कार्यकारणीचा शपथग्रहण उत्साहात

0
14

हिंगणा (प्रतिनिधि)

मारवाडी युवा मंचाच्या नागपूर शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण सोहळा अखिल भारतीय मारवाडी संमेलनाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसी हिंगणा नागपूर येथील एम आय ए क्लब येथे उत्साहात पार पडला.

सोहळ्याला शपथविधी अधिकारी म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पंचारिया यांनी नवीन कार्यकारिणीला शपथ दिली. व मार्गदर्शन केले

यावेळी महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे संघटनमंत्री वीरेंद्रप्रकाश धोका महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे प्रदेश महामंत्री निकेश गुप्ता, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज अग्रवाल नागपूर जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, मारवाडी युवा मंचाचे विदर्भ प्रमुख महेश बंग, अध्यक्ष राजेश अग्रवाल, माजी अध्यक्ष अजय मल, निशांत गांधी, संजय पालीवाल, सुधीर बाहेती, अतुल कोटेचा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना माजी मंत्री रमेशचंद्र बंग म्हणाले की मारवाडी युवा मंच म्हणजे एका समाजाची संघटना नसून ज्या कुटुंबांचे मूळ हे राजस्थान आहे अशा सर्व समाजातील नवयुवक यांना घेऊन चालणारी ही संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून आपली बोलीभाषा आपली संस्कृती जोपासण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे तसेच देशातील ज्या ज्या प्रदेशात मारवाडी युवा मंचच्या शाखा आहेत त्या ठिकाणी मारवाडी युवा मंचा द्वारे सर्वसामान्य जनतेकरिता विविध उपक्रम राबविले जातात.

पुढे बोलताना बंग म्हणाले की मारवाडी युवा मंचाची नागपूरला स्थापना तीस वर्षांपूर्वी करण्यात आली. आता मारवाडी युवा मंचच्या शाखा शहराबरोबरच ग्रामीण भागातही उघडून संपूर्ण देशात एक चळवळ म्हणून उदयास यावी व त्या माध्यमातून निरंतरपणे जनसेवा करत राहावी.

निकेश गुप्ता यांनी मारवाडी युवा मंच या संघटनेविषयी विस्तृत माहिती दिली देशातील 24 राज्यात, 750 शाखांच्या माध्यमातून मारवाडी युवा मंच समाजसेवेचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तर वीरेंद्रप्रसाद धोका यांनी मारवाडी युवा मंच द्वारे सुरू असलेल्या कार्याची प्रशंसा केली व पुढेही मंचा द्वारे विविध लोकोपयोगी कार्य करून मोठ्या प्रमाणात समाजसेवेचे व्रत जोपासावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

मारवाडी युवा मंचच्या नागपूर शाखेच्या नवीन कार्यकारणीत

अध्यक्ष म्हणून कन्हैय्या मंत्री, सचिव हेमंत शर्मा, कोषाध्यक्ष अश्विन अग्रवाल,उपाध्यक्ष हरेशकुमार सोनी, किशोर पालिवाल, सहसचिव चिंटू पालिवाल, सहकोषध्यक्ष मधुर बंग, संघटन मंत्री हिमांशू चांडक तर कार्यकारणी सदस्य म्हणून आदित्य भैय्या,विश्वजित भगत, विजय जोशी,आशिष चांडक, महेश सत्यनारायण बजाज, अंतुष खंडेलवाल, सुनील डागा, अरिहंत बैद, प्रतीक बागडी, सचिन अग्रवाल, हरीश राठी, विजय सारडा, लक्षिणारायन मनियार आदीं पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ प्रमुख महेश बंग यांनी केले सूत्रसंचालन सुधीर बाहेती यांनी तर आभार हेमंत शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मारवाडी युवा मंच नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here