शेतीच्या वादातून एकाची हत्या तर तीन जखमी

0
9

सेलू वर्धा दिनांक 25 सप्टेंबर ( प्रतिनिधी)

शेतीच्या करणातून झालेल्या भांडणात एकाची धारदार विळ्याने हत्या करण्यात आली, ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली, वसंता तानबाजी पोहणे वय 40 वर्ष रा, घोराड असे मृतकाचे नाव आहे, तर तीन जण जखमी झाले आहे, यात चार जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती ता, 26 रविवारी सेलू पोलिसांनी दिली,

याबाबत प्राप्त माहिती अशी की तालुक्यातील घोराड येथील वसंता पोहणे आणि नथ्थु तेलरांधे यांचा शेतीवरून वाद सुरू होता, याच करणातून दोघांचाही ता, 25 शनिवारी दुपारी वाद झाला होता, त्याची पोलिसांत तक्रार झाली होती,

पोलिसांनी त्यात कारवाई करून दोघांनाही समज देऊन सोडून दिले होते, त्यानंतर पुन्हा रात्री 9 वाजता वसंता पोहणे हा पाच सहा जणांना घेऊन नथ्थु तेलराधे यांचे घरी गेला होता, तेथे त्यांचा चांगलाच वाद झाला, विजय नथ्थु तेलरांधे वय 26 वर्ष याने घरातील धारदार विळ्याने हमला चढविला, यात वसंता पोहाने याच्या छातीत विळ्याने वार केल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली पडला, सोडविण्यास आलेल्या मृतकाच्या मुलाला आणि इतर दोघांनाही आरोपीने विळा घेऊन मारहाण केली त्यात ते पळून गेल्याने जखमी झाले

वसंताला सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉकटरांनी त्याला मृत घोषित केले, इतर तीन जणांवर उपचार करण्यात येऊन त्यातील एक गंभीर जखमी असल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अतिरीक्त पोलीस अधीक्षक साळुंखे, उप अधीक्षक पियुष जगताप यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली, ठाणेदार रविंद्र गायकवाड परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत, पोलिसांनी विजय तेलरांधे वय 26, नथ्थु तेलरांधे वय 52 वर्ष आणि दोन महिलांवर हत्येचा गुन्हा नोंद केला आहे

यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी विजय तेलरांध्ये हा फरार झाला आहे, शवविच्छेदनानंतर मृतक वसंता पोहाने याचेवर घोराड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला, या घटणेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे, मृतकाचे पश्चात पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे, घटनेचा तपास ठाणेदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे करीत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here