पुढील चार दिवस विदर्भात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

0
11

हवामान विभागाच्या अंदाजानुसार नागपूर, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर, गडचिराेली, वर्धा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस काही ठिकाणी विजांचा कडकडाट व हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर २९ ऑगस्टपासून सर्वत्र जाेरदार पाऊस हाेईल. विभागाने यादरम्यान येलाे अलर्टचा इशारा दिला आहे. वर्धा, नागपुरात बहुतेक ठिकाणी तर भंडारा, गाेंदिया, गडचिराेलीत सर्वच ठिकाणी पावसाच्या सरी येतील. उल्लेखनीय म्हणजे दहा-बारा दिवस दडी मारल्यानंतर मागील आठवड्यात १६ ते १८ ऑगस्टदरम्यान पावसाने जाेरदार धडक दिली. त्यानंतर मात्र पुन्हा ताे गायब झाला.

अमरावती, अकाेला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. हवामान खात्याने या विभागात मात्र पावसाची शक्यता नसल्याचे वर्तविले आहे. दरम्यान, गुरुवारी चंद्रपुरात एका ठिकाणी पाऊस पडला; पण इतर सर्व जिल्हे काेरडेच राहिले. पाऊस गायब झाल्याने तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. नागपूरचे तापमान ३३.८ अंश नाेंदविण्यात आले. सर्वाधिक ३४ अंश तापमान चंद्रपूरचे हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here