वर्धा येथील यश देशमुख या विद्यार्थ्यांस इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड व ऑफिसियल वर्ल्ड रेकॉर्ड मानांकन

0
8

वर्धा येथील यश देशमुख या विद्यार्थ्यांस

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड व ऑफिसियल वर्ल्ड रेकॉर्ड मानांकन

• नववीतील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीयस्तरावर झेप

• यश देशमुखचे विभागीय आयुक्तांकडून कौतुक

वर्धा, दि. 24 (जिमाका): वर्धा जिल्ह्यातील वायगाव (निपाणी) येथील सर्वसाधारण कुटुंबातील नवव्या वर्गात शिकणाऱ्या यश महेंद्र देशमुख या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन मानांकने प्राप्त केली आहे. ही मानांकने प्राप्त करणारा तो सर्वात कमी वयातील विद्यार्थी ठरला आहे.

यापुर्वी इंडियाज वर्ल्ड रेकॅार्ड मानांकन प्राप्त करणाऱ्या यशने या नामांकनासाठी सहभाग नोंदविला होता. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड व ऑफिसियल वर्ल्ड रेकॉर्ड ही अतिशय मानाचे दोन मानांकन प्राप्त झाले आहे. एकाच वेळी प्रतिष्ठेची दोन मानांकने मिळविणार देखील तो पहिलाच ठरला. जगभरातील 190 देशातील व्यक्ती ही मानांकने मिळविण्यासाठी सहभाग नोंदवित असतात.

ही प्रतिष्ठेची मानांकने प्राप्त झाल्यानंतर आज त्याने आपल्या कुटुंबियांसह विभागीय विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी भेट घेतली. यावेळी विभागीय आयुक्तांनी त्याचे कौतूक केले. एक चांगला नागरिक बनून पालकांचा मान वाढवत, असेच यश संपादित कर आणि देशाचे नाव मोठे कर, अशा शुभेच्छा विभागीय आयुक्तांनी दिल्या. यशचे वडील महेंद्र देशमुख, आई मनीषा देशमुख आणि काका प्रमोद देशमुख देखील यावेळी उपस्थित होते.

यश महेंद्र देशमुख वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयातील केंद्रीय विद्यालयामध्ये नवव्या वर्गात शिकत आहे. वयाच्या बाराव्या वर्षांपासून तो वेगवेगळ्या विषयावर सातत्याने प्रेरणात्मक व्याख्याने देत असतो. यशला इंडियाज वर्ल्ड रेकॅार्डचे तीन महिन्यापूर्वी नामांकन मिळाल्यानंतर आता शालेय विद्यार्थी या गटातून यंगेस्ट इंस्पिरेशनल स्पिकर व यंगेष्ट इग्नाइट स्पिकर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड व ऑफिशियल वर्ल्ड रेकॉर्ड नामांकन प्राप्त झाले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here