चालत्या वाहनात युवतीवर बलात्कार

0
9

अकोला दिनांक 24 मे ( प्रतिनिधी)

जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातील माना येथील तरूणीवर कंझरा रस्त्यावर वाहनात अतिप्रसंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुर्तीजापुर शहर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या १७व्या वर्षापासून अकोला जिल्ह्यातील माना येथील मुलगी शिक्षणासाठी मुर्तिजापूर येथे ये-जा करते. यादरम्यान, तिची ओळख प्रवाशी वाहून नेणारा मॅक्सीमा वाहनाचा चालक शेख मोहसीन शेख मन्नू याच्याशी झाली.

त्याने याचा फायदा उचलत तिला शारीरिक सुखाची मागणी केली असता तिने स्पष्ट नकार दिल्याने या तरूणीवर कंझरा रस्त्यावर वाहनात अतिप्रसंग करण्यात आला आहे. या तिघांनाही न्यायालयाने २७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

यांच्यावर झालेत गुन्हे दाखल…

शेख मोहसीन शेख मन्नू (वय २७, राहणार, माना, ता. मुतिजापुर, जि. अकोला.), सुमित गोंडणे (वय २१, राहणार, माना, ता. मुतिजापुर, जि. अकोला.) आणि कुणाल वासनिक (वय २७, राहणार, माना, ता. मुतिजापुर, जि. अकोला.) यांच्याविरुद्ध मुर्तीजापुर पोलीस ठाण्यात ३७६, ५०६, ३२३, ४३ सहकलम ३(१)(आर)(एस)(डब्लू) अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. लागलीच पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here