भंडारा येथे खोदकामात सापडले पुरातन महादेव मंदीर

0
13

भंडारा दि 27 मे: पैनगंगा नदीवर असलेल्या अनिकटच्या मागे जानेफळ रोड येथे माती खोदकाम चालू असता पुरातन काळातील महादेवाचे हेबाडपंथी मंदिर सापडले आहे

एखाद्या मोठ्या पुरात हे मंदिर गाडल्या गेल्या असल्याचे जाणकारांचे मत आहेे, खोदकामादरम्यान एक नंदी मूर्ति,महादेव मूर्तीचे अवशेष आणि मंदिराचे दगड मजुरांना खोदकामात सापडले आहे

मजुरांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली,अधिकाऱ्यांनी ही माहिती नायब तहसीलदार डॉ.संजय गरकल यांना दिली असता त्यांनी ताबडतोब या मूर्तींचे छायाचित्र नागपूर पुरातत्व विभागाला पाठवले आहे,या ठिकाणी खोदकाम थांबवून हे ठिकाण सुरक्षित करण्यात आले आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here