चना खरेदीस 25 जुन पर्यंत मुदतवाढ

0
9

वर्धा दि.25: हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार जिल्हयात नाफेडच्या वतीने दहा केंद्रावरुन चना खरेदी करण्यात येत आहे. शेतक-यांना चना विक्री करीता आनन्यासाठी 25 मे पर्यंत देण्यात आली होती.

केंद्र शासनाने याला 25 जुन पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे 17 फेब्रुवारी पर्यंत चना खरेदीसाठी नोंदणी केलेल्या व अद्यापही चना विकला नाही (ज्या शेतक-यांना एस.एम.एस.प्राप्त झाले आहे) अशा शेतक-यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह कारंजा, आष्टी, आर्वी, हिंगणघाट, सिंदी , सेलू, पुलगाव, देवळी, समुद्रपूर व वर्धा या केंद्रावर चना विक्रीसाठी आणावा, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here