वर्ध्यातील निर्बंधांअतर्गत काय सुरु असेल आणि काय बंद?
– अत्यावश्यक, वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी.
– किराणा, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ सर्व दुकान बंद राहणार, सकाळी 7 ते सकाळी 11 वाजतापर्यंत घरपोच सेवा देता येणार, ग्राहकांना दुकानात जाता येणार नाही.
– शिवभोजन थाळी, हॉटेल, खानावळ सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत केवळ घरपोच पार्सल सुविधा राहणार.
– बाजार समित्या, क्रीडांगण, उद्यान, शाळा, ट्युशन क्लासेस, लग्न, सोहळे, कार्यक्रम, मंगल कार्यालय, नागरी भागातील पेट्रोल पंप, शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय बंद असणार.
– बँक, पतसंस्था, पोस्ट ग्राहकांना बंद राहील, प्रशासकीय कामकाज सुरू राहील.
– जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून मालवाहतूक, रुग्ण वाहतूक मात्र सुरूच असणार.
– दूध संकलन, वितरण सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 8 वाजतापर्यंत सुरू असणार.
– मेडिकल, वैद्यकीय दवाखाने, पशुचिकित्सा, वैद्यकीय सेवा सुरू राहणार.
– घरपोच सेवा देणाऱ्यांना ओळखपत्र आणि rtpcr टेस्ट निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक.
– या काळात अत्यावश्यक सेवा, कोरोनाशी संबंधित शासकीय आणि निमशासकीय कार्यालय उघडे राहणार आहे तर इतर सर्व कार्यालये बंद राहणार आहे.
– या काळात खाजगी आणि शासकीय प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.






