यवतमाळ दि. 05 एप्रिल (प्रतिनिधी) :
कोविड-19 विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली वनविभागाची पर्यटन स्थळे शासनाच्या सूचनेनुसार 1 एप्रिल 2022 पासून पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत.
सुरू करण्यात आलेल्या वनपर्यटन स्थळांमध्ये यवतमाळ तालुक्यातील उमरसरा येथील ऑक्सीजन पार्क व वसंत स्मृती वनउद्यान तसेच वडगाव-जांब येथील जैवविविधता उद्यान, आर्णी येथील मांगुळ वनउद्यान, नेर येथील वनउद्यान (ॲरोमा पार्क), दारव्हा येथील दारव्हा वनउद्यान तसेच श्री. महालक्ष्मी संस्थान देऊळगाव (वळसा) वनउद्यान या पर्यटन स्थळांचा समावेश आहे






