महाशिवरात्रीच्या दिवशी मुलाला वाचविताना मुलासोबत आईचाही…..

0
8

चंद्रपूर दिनांक 2 मार्च (प्रतिनिधी)

महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका मायलेकाचा एकत्र मृत्यू झाली आहे. महाशिवरात्रीला वर्धा नदी पात्रात आंघोळ करायला गेलेला मुलगा खोल पाण्यात गेल्याने बुडू लागला. मुलाला वाचवण्यासाठी आई धावून गेली. पण दुर्दैवाने यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकमूर-लोणवली घाटावर घडली. पदमा अरकोंडा, रक्षित अरकोंडा अशी मृत आई आणि मुलाची नावं आहेत. दोघेही तेलंगणातील लोणवाही येथील रहिवाशी आहेत. पदमा अरकोंडा, रक्षित अरकोंडा हे दोघे माय-लेक महाशिवरात्रीला वर्धा नदी पात्रात आंघोळीला गेले. गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर-लोणवाही घाटावर मुलगा आंघोळ करीत असतांना खोल पाण्यात गेला.

मुलगा पाण्यात बुडत आहे, हे लक्षात येताच मुलाला वाचवण्यासाठी आई धावून गेली. मात्र, यात माय-लेकाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. तर घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलीसांनी घटनास्थळ गाठलं. बऱ्याच प्रयत्नानंतर माय-लेकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तर या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here