दोनही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष,विविध शासकीय योजनांचा लाभ

0
10

कोविडमुळे कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ

 कुटुंबांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुका समित्या

 दोनही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष

 स्वयंसेवी संस्थांमार्फत बालकांचे शैक्षणिक शुल्क

 जिल्हाधिकाऱ्यांकडून मिशन वात्सल्यचा आढावा

          वर्धा, दि.18 (प्रतिनिधि) : कोविडमुळे दोनही पालक गमावलेल्या बालकांना एकरकमी 5 लक्ष रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे.

बालकांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती स्वयंसेवी संस्थांमार्फत भरली जाणार आहे. कोविडमुळे घरचा कर्ता पुरुष गमावून विधवा झालेल्या

महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असून त्यासाठी तालुकास्तरीय समित्या गठीत करण्यातआल्या आहे.

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मिशन वात्सल्य योजनेचा आज आढावा घेतला.

मिशन वात्सल्य योजनेंतर्गत तालुकास्तरीय समितीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा

जिल्हास्तरीय कृती दल समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर,

विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधिश निशांत परमा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, समाज कल्याणचे सहाय्यक

आयुक्त प्रसाद कुळकणी तसेच सर्व गटविकास अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

कोविड आजारामुळे कर्ता पुरुष गमावलेल्या विधवा पत्नीच्या कुटूंबाला कुटूंब निवृत्तीवेतन, शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, जन्म व मृत्यु

प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, घरकुल, अनाथ बालकांचे

शालेय प्रवेश व शुल्क, आदिवासी विभागामार्फत राबविण्या येणाऱ्या योजना, बाल कल्याण विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा

लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्यासाठी तालुका स्तरावर समित्यांचे गठण करण्यात आले आहे. सदर तालुका समित्यांनी गाव व

शहरस्तरावर पथक तयार करुन माहिती गोळा करावी. योजनेच्या लाभासाठी पात्र असलेले एकही कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता

घेण्यात यावी, अशा सुचना बैठकीत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केल्या.

विधवा महिलांच्या उपजिविकेसाठी स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी कार्यालया मार्फत

प्रशिक्षण देण्याची कारवाई करावी, अशा सुचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तालुका व जिल्हास्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी

तात्काळ मिशन वात्सल्य योजनेची कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी सर्व संबंधित तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दिले.

कोविडमुळे पालक गमावलेल्या 18 वर्षा आतील बालकांच्या शिक्षण शुल्काची रक्कम स्वयंसेवी संस्थेच्यावतीने देण्यात येणार आहे.

त्यासाठी शिक्षण विभागाने बालक शिकत असलेल्या शाळेतून बालकांची यादी तयार करुन तसा प्रस्ताव महिला व बाल विकास कार्यालयास पाठवावा, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here