गोंदियात ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

0
20

गोंदिया( प्रतिनिधी) दि 21 ऑगस्ट:

शहरात एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना आज 21 ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अशोक कौशिक असे मृतकाचे नाव आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण आहे. कोणत्या कारणातून हत्या करण्यात आली याचा तपास पोलिस घेत आहेत.

मृतक अशोक कौशिक शहरातील सर्कस ग्राउंड परिसरात राहतात. कौशिक यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान ते फिरायला गेले होते. पाठीमागून आलेल्या आरोपीने त्यांच्या मानेवर बंदूक ताणली. कौशिक यांना काही कळायच्या आत गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आरोपीने घटनास्थळीच बंदूक फेकून देत पळ काढला. रस्त्यावरून येजा करणाऱ्यांनी कौशिक यांचा मृतदेह पाहताच गोंदिया शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. गोंदिया शहर पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून पोलीस पथक आरोपीच्या मागावर आहेत सर आज घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here