वर्धेत उद्या 91 लसीकरण केंद्रावर होणार लसीकरण,18 हजार डोस प्राप्त 

0
13

वर्धा दि 16 जुलै :- जिल्ह्यात आतापर्यंत 4 लक्ष 23 हजार 976 नागरिकांना कोविड लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. शासनाकडून प्राप्त लसीचे डोसच्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून कोविशील्ड लसीचे 18 हजार डोस प्राप्त झाले असून उद्या 89 केंद्रावर 18 वर्षापुढील सर्व वयोगटासाठी लसीकरण सुरू राहील. तसेच कोव्हक्सीन लसीचे डोस दोन केंद्रावर उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

18 वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांसाठी पहिला डोस तसेच 45 वयापेक्षा जास्त नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 89 लसीकरण केंद्रावर उपलब्ध राहील. तसेच कोव्हक्सीन लसीचे डोस पोलीस रुग्णालय आणि वायगाव निपाणी उपकेंद्र या दोन केंद्रावर उपलब्ध आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here