ब्राम्हणवाडा निर्वाचक गणात आचारसंहिता लागू

0
8

वाशिम दिनांक 12 मई (प्रतिनिधी) :

मालेगांव पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या ब्राम्हणवाडा निर्वाचक गणाच्या पोटनिवडणूकीचा जून 2022 करीता प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांच्या 11 मे 2022 च्या पत्रानुसार जाहिर करण्यात आला आहे.

ब्राम्हणवाडा निर्वाचक गणाच्या क्षेत्रात 11 मे 2022 पासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यापासून ते निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत या क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील.

निवडणूकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता तसेच निवडणूकीकरीता लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहितेमधील तरतूदीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here