वाशिम दिनांक 6 मे ( प्रतिनिधी)
वाशिम येथील जिल्हा सत्र न्यायाधीश रचना तेहरा यांच्या गाडीला काल रात्री १० च्या सुमारास वाशिम पूसद रोडवरील जागमाथा वळणावर अपघात झाला.
या अपघातात न्याय.रचना तेहरा यांच्यासह चालक किरकोळ जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना वाशिम येथील श्रीकृष्ण हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले आहे.
चालकाचा अंदाज चुकल्याने अपघात…
मंगरूळपीरहून वाशिमच्या दिशेने येत असताना जागमाथा येथील वळण मार्गावर चालकाचा अंदाज चुकल्याने त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम.एच.२६ ए.के ७४८८ ही रस्त्याच्या कडेला १० फुट खोल जावून खांबाला धडकली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना बाहेर काढुन पुढील उपचारार्थ वाशिम येथे रवाना केले





