शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आज २ मे रोजी वाशीम येथे

0
12

वाशिम दि. 02 मे (प्रतिनिधी)

राज्याचे शालेय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास,महिला व बालविकास, इतर मागास व बहुजन कल्याण व कामगार विभाग राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे आज २ मे रोजी वाशिम येथे येत आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सायंकाळी ५:३० वाजता शासकीय वाहनाने अकोला येथून वाशिमकडे प्रयाण. सायंकाळी ७ : ३० वाजता वाशिम येथे आगमन. महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ केंदळे लेआउट येथे शिवव्याख्याते शिवरत्न शेटे (संस्थापक हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य) यांच्या ” छत्रपती शिवराय यांचेपासून काय शिकावे ” या विषयावरील शिव व्याख्यानाला उपस्थित राहून सोयीनुसार अमरावतीकडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here