वाशिम दि.28 (प्रतिनिधि)
जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.जिल्ह्यात आज 28 डिसेंबर रोजी 4 हजार 940 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 476 व्यक्तींनी व दुसरा डोस 4 हजार 464 व्यक्तींनी घेतला.
वाशिम तालुका : पहिला डोस – 94 व दुसरा डोस -783 असा एकूण 877, मालेगाव तालुका : पहिला डोस – 76 आणि दुसरा डोस – 809 एकूण 885, रिसोड तालुका : पहिला डोस -75 व दुसरा डोस -952 एकूण 1027,कारंजा तालुका : पहिला डोस – 121 आणि दुसरा डोस -714 एकूण 835,मानोरा तालुका : पहिला डोस – 50 व दुसरा डोस 610 एकूण 660 आणि मंगरूळपीर तालुका : पहिला डोस -60 आणि दुसरा डोस – 596 असा एकूण 656 व्यक्तींना देण्यात आला.






