वर्धा: चार नगर पंचायत निवडणूकी करीता आचार संहिता लागू

0
14

वर्धा, दि.25 (प्रतिनिधी) :- राज्यातील नगरपंचायत सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. त्यानुसार वर्धा जिल्हयातील आष्टी, कारंजा(घाडगे), सेलू व समुद्रपूर या चार नगर पंचायतीच्या सदस्य पदासाठी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून संबंधित नगर पंचायत क्षेत्रात आचार संहिता लागू करण्यात आली आहे.

ही आचार संहिता निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत लागू असणार आहे. आदर्श आचार संहिता भंग होणार नाही यांची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here