ट्रॅव्हल्स पॉइंटसाठी पर्यायी जागा निवडतांना प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधाण्य द्यावे: जिलाधिकारी

0
11

रस्ता सुरक्षा उपाययोजना आढाव्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

 रस्यांरकवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी

 प्रत्येक चौकात झेब्रा क्रॉसिंग असावे

 रत्यावरील गतीरोधक अपघात टाळण्यासाठी असावे, ते अपघाताचे कारण ठरू नये

 वाहतुक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई

 

यवतमाळ दि. 30 नोव्हेंबर :(प्रतिनिधि)

यवतमाळ शहरातील खाजगी प्रवाशी वाहतुकीचा ट्रॅव्हल्स पॉइंट बस स्थानकापासून 200 मीटरच्या बाहेर अथवा शहराबाहेर स्थलांतरीत करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगरपालीका व पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे योग्य जागेची पाहणी करावी. शहरात ट्रॅव्हल्सचा अडथळा किती होतो व तो कसा दूर करता येईल, सुरक्षीततेच्या दृष्टीने प्रवाशांना दिवसा व रात्रीचे वेळी कोणतीही अडचण व त्रास होणार नाही तसेच त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा जवळपास उपलब्ध होतील, याबाबत पाहणी करून 15 दिवसात पर्यायी जागा सूचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हा रस्ता सुरक्षा उपाययोजना समितीचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज महसुल भवन येथे घेतला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, राष्ट्रीय राज्य महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पागृत, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक आर.एम. महल्ले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डी.आर.चवणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रमोद सुर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.एस.श्रावणी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाले की रत्यांवरील अतिक्रमणामुळे अपघात होऊ नये, यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे रस्ते ज्यांच्या अख्या. रीत आहे त्यांनी रस्यांीमवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी व असलेले अतिक्रमण तातडीने काढून रस्ते मोकळे करावे. जेथे रस्त्याचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी माहितीसाठी बोर्ड लावणे, रिफ्लेक्टर व दिशा दर्शक लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक चौकात झेब्रा क्रॉसिंग असावे, हे काम पुर्ण करण्यासाठी विशेष मोहिम घेण्याचेही त्यांनी सांगितले.

रत्यावरील गतीरोधक हे अपघात टाळण्यासाठी असावे, ते अपघाताचे कारण ठरू नये, यासाठी नियमानुसार आवश्यक तेथेच गतीरोधक ठेवावे, त्याला मार्कींग करावे व त्याबाबतचे माहितीफलकही योग्य अंतरावर लावण्यात यावे. तसेच अनावश्यक व अपघातांना कारणीभूत ठरणारे नियमबाह्य गतीरोधक काढून टाकावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे प्रमाण वाढावे यासाठी नियमितपणे जनजागृती करावी. त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करावे व तरीही वाहतुक नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करावी. महाविद्यालये, शासकीय कार्यालये येथे देखील वाहतुक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच सदर कार्यवाही विहित कालावधीपुरती मर्यादित न ठेवता नियमीतपणे करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

बैठकीला अभियंता वसंत नाल्हे, नगरपालीकेच्या प्रियंका फुकटे, निखील पुराणिक, राजेश कुमार आदि. उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here