शासकीय दुधाचे नविन दर जारी

0
24

नागपूर दि.29 :(प्रतिनिधि)

शासकीय दुध योजनेंतर्गत विक्री करण्यात येणाऱ्या पाश्चराईड व होमोनाईज्ड गाय दुध व टोन्ड (आरे) दुधाच्या विक्रीचे दर 1 डिसेंबर पासून प्रति लिटर (1000 मि.ली.) रुपये 39/- व अर्ध्या लिटर (500 मि.ली.) रुपये 20/- दर सर्व करासह आकारण्यात येईल.

त्याचप्रमाणे दुग्धशाळेतील उपलब्ध असलेल्या जुन्या दराच्या पॉलीथीन फिल्मचा साठा संपुष्ठात येई पर्यंत व वाढीव दराची पॉलीथीन फिल्म उपलब्ध होईपर्यंत जुन्या दराच्या पॉलीथीन फिल्ममधून दुधाची विक्री करण्यात येईल. सर्व ग्राहक व वितरकांनी नोंद घेऊन योजनेस सहकार्य करावे, असे आवाहन दुग्धशाळा व्यवस्थापक, शासकीय दुध योजना, वर्धा यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here