सुभाष चौक येथे नवीन मतदान नोंदणी अभियानास सुरुवात

0
12

वाशिम दिनांक 15 नोव्हेंबर (शहर प्रतिनिधी)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादी नूतनीकरण मोहीम राबविण्यात येत असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी तर इतरांना दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे.

या अभियानांतर्गत सुभाष चौक वाशीम येथे नवीन मतदान नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली, राष्ट्रवादी शहर युवक कार्याध्यक्ष अजय मोतीवार यांच्या नेतृत्वात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून नागरिकांना 17 नोव्हेंबर पर्यंत सुभाष चौक येथे मतदान नोंदणी करण्याची सुविधा मिळणार आहे

सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागरिक सुभाष चौक येथे येऊन आपले नाव मतदार यादीत नोंद करून घेवू शकतात, 18 वर्षावरील सर्व नागरिक आपले नाव नोंदवू शकतात

आवश्यक कागदपत्रे

◼️नवीन मतदान पत्र बनविण्यासाठी लागणारे कागदपत्र.

▪️दोन पासपोर्ट साईझ फोटो

▪️आधार कार्डची झेरॉक्स

▪️जन्माचा दाखल

▪️शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र

▪️घरच्या कुठल्याही सदस्याचे मतदान पत्र

वरील कागदपत्रे घेऊन ज्यांचे नाव मतदान यादीत नाही अशा नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने17 नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुभाष चौक येथे येऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवून घेण्याचे आव्हान अजय मोतीवार यांनी केले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here