वाशिम दिनांक 15 नोव्हेंबर (शहर प्रतिनिधी)
सोमवार 15 नोव्हेंबर कार्यालयीन वेळेत सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 आणि विवाह अधिकारी यांचे कार्यालय बंद असून यामुळे खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे , विशेष म्हणजे शुक्रवारी लिंक नसल्यामुळे आणि शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे तीन दिवसानंतर कार्यालय सोमवारी उघडले होते
शुक्रवारी लिंक नसल्यामुळे सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालयात कार्य ना होताच लोकांना परत यावे लागले होते आणि शनिवार रविवार शासकीय सुट्टी असल्यामुळे कार्यालय बंद होते
तीन दिवसानंतर लोक आज पुन्हा कार्यालयात पोहोचले पण अचानक थोड्यावेळानंतर कार्यालय बंद करण्यात आले यामुळे लोकांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागत आहे,कार्यालयात कासव गतीने कार्य होत असल्याचा अनुभव आल्याचा यावेळी उपस्थित लोकांनी सांगितले






