हिंगणा नागपूर दिनांक 5 सप्टेंबर ( प्रतिनिधी )
माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी नागपूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांची जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. व शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या मतदान ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्याच्या मोहिमेला हिंगणा विधानसभा क्षेत्रात गती देऊन हिंगणा विधानसभा क्षेत्रात असलेले बहुसंख्य बोगस मतदान कमी करावे अशी मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा.सुरेंद्र मोरे, वाडी नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते राजेश जयस्वाल, वाडी शहराध्यक्ष वसंतराव ईखणकर, राकापा. सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, माजी नगरसेवक शाम मंडपे, वाडी शहर कार्याध्यक्ष दिनेश उईके आदी उपस्थित होते






