मुलांच्‍या कलागुणांना जोपासणे काळाची गरज – राहूल पांडे 

0
10

नागपूर दिनांक 5 सप्‍टेंबर (शहर प्रतिनिधी)

लहान मुलांमध्‍ये अनेक सुप्‍त कलागुण असतात. त्‍यांची जोपासना केली तर त्‍यांचे व्‍यक्तिमत्‍व उजळून निघते. एक सुबुद्ध, जबाबदारी व्‍यक्‍ती आणि नागरिक घडवण्‍यासाठी मुलांच्‍या या कलागुणांना जोपासणे ही काळाची गरज आहे.

‘माझा बाप्‍पा’ सारख्‍या विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍यातील सुप्‍त गुणांना वाव दिल्‍याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करतो, असे मत राज्‍य माहिती आयुक्‍त राहूल पांडे यांनी केले.

शिक्षक सहकारी बँक लि. व ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्‍या संयुक्‍त विद्यमाने शहरातील विविध शाळांमध्‍ये आयोजित ‘माझा बाप्‍पा मीच बनवणार’ या कार्यशाळेतील विजेत्‍यांचा सत्‍कार समारंभ सोमवारी शिक्षक सहकारी बँकेच्‍या सभागृहात आयोजित करण्‍यात आला.

यावेळी राष्‍ट्रीय व महाराष्‍ट्र राज्‍य पुरस्‍कार प्राप्‍त सभासद, दहावी-बारावी शालांत प‍रीक्षेत सभासदांच्‍या गुणवंत पाल्‍यांचा सत्‍कारही मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. शिक्षक दिनानि‍म‍ित्‍त थोर शिक्षक डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍ण यांना अभिवादन करण्‍यात आले.

कार्यक्रमाला राज्य माहिती आयुक्‍त राहुल पांडे प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्‍थति होते तर लेखक व समाजसेवक डॉ. कुमार शास्‍त्री प्रमुख वक्‍ते होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षक सहकारी बॅक लि. चे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले होते. मंचावर शिक्षक आमदार नागो गाणार, शिक्षक सहकारी बँकेचे संचालक योगेश बन यांचीही उपस्‍थ‍िती होती.

डॉ. कुमार शास्‍त्री यांनी सर्व पुरस्‍कार प्राप्‍त विद्यार्थ्‍यांचे आणि शिक्षक दिनानिम‍ित्‍त शिक्षकांचेही अभिनंदन केले. अध्‍यक्षीय भाषणात प्रा. अनिल सोले म्‍हणाले, ‘माझा बाप्‍पा मीच बनवणार’ या उपक्रमात नागपुरातील शाळांना भरपूर प्रतिसाद दिला. शहरातील 2700 विद्यार्थी व 34 शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सहकारी बँकेचे संचालक योगेश बन यांनी तर प्रास्‍ताविक उपाध्‍यक्ष अनिल मुळे यांनी केले. भोलानाथ सहारे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी राजू कनाटे, राजू बोंबाटे, प्रदीप बिबटे, अनिल शिवणकर, योगेश बन, भोलानाथ सहारे, महेंद्र राऊत, नरेश कामडे, किशोर पाटील व श्रीकांत गडकरी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here