हिंगणा दिनांक 5 सप्टेंबर ( प्रतिनिधी)
स्थानिक श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था हिंगणा येथे देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती व त्यानिमित्त साजरा करण्यात येणारा शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सातत्याने स्वतः शिकून शिकवत असणारा शिक्षक अनेक विद्यार्थी घडवतो आणि त्या विद्यार्थ्यांच्या यशातच स्वतःचे आनंद शोधतो असा शिक्षक मात्र प्रकाश झोतापासून अलिप्त राहतो अशा शिक्षकांचा गौरव करण्याच्या हेतूनेच संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेतर्फे संस्थेद्वारा संचालित स्व. देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित संस्थेतील अनेक शिक्षकांनी विविध विषयावर आपले विचार प्रगट केले. व विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील ऋणानुबंध किती घट्ट असते याचे अनेक उदाहरणे सांगितली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे संचालक महेश बंग, संचालिका अरुणा बंग, प्राचार्य नितीन तुपेकर, मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, मुख्याध्यापक सुरेश गुडधे, मुख्याध्यापक संदीप कैलुके, प्राचार्य देवेंद्र ढोमणे, मुख्याध्यापिका सुप्रिया तुपेकर, मुख्याध्यापक महेश चौधरी, मुख्याध्यापक पुरुषोत्तम काटोले, मुख्याध्यापिका मंगला लकडे, मुख्याध्यापक हेमराज शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाला संस्थेद्वारे संचालित स्वर्गीय देवकी बाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणा, नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणा , स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम स्कूल कन्होलीबरा, अनुदानित आदिवासी आश्रम शाळा देवळी पेंढरी, स्व. गोपीकिशन बंग विद्यालय देवळी पेंढरी, विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रम शाळा कन्होलीबरा, कृषी तंत्र निकेतन विद्यालय मोंढा, स्व. देवकी बाई बंग मराठी माध्यम प्राथमिक शाळा हिंगणा,विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रम शाळा मांडवा उमरेड आदी शाळांमधील शिक्षक उपस्थित होते.







