वर्धा, दि. 29 :केंद्र शासनाच्या खेलो इंडिया प्रकल्प अंतर्गत संपूर्ण भारतात खेलो इंडियाचे एक्सलन्सी सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. यावर्षी बॉक्सिंग या खेळाचे खेलो इंडिया प्रकल्पाअंतर्गत केंद्र मंजूर झालेले आहे. सदर केंद्राकरीता प्रशिक्षणार्थीची निवड जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाचे वतीने 1 ऑक्टोंबर करण्यात येणार आहे.
यासाठी पात्र खेळाडूंनी 1 ऑक्टोंबरला सकाळी 9 वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथे जन्म तारखेच्या पुराव्यासह उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी केले आहे.
चाचणी 12 वर्षाखालील मुले व मुली (1 जानेवारी 2010 नंतर जन्मलेले) यांच्या करीता असुन चाचणीमध्ये 800 मीटर धावने, हॅन्डग्रीप चाचणी, मेडिसिन थ्रो बॉल, स्टँडिंग वर्टीकल जम्प, 30 मीटर फ्लाय धावने, हॅरीस टेस्ट फॉर एजीलीटी, बेंन्ड ॲन्ड रीच या बाबी असणार आहे.






