वर्धा दिनांक 4 जुलै (प्रतिनिधी) :
नागरिकांना आपल्या परिसरात होत असलेल्या अवैध, भेसळयुक्त व बनावट दारु विक्रीची माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा ऑनलाईन तक्रार करावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
अवैध, भेसळयुक्त व बनावट दारु विक्री करणा-या विरुध्द तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने राज्य स्तरावर 180023339999 टोल फ्री क्रमांक व 8422001133 हा व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु केला आहे.
तसेच जिल्हा स्तरावर अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय वर्धा येथे 07152-240163 हा दुरध्वनी क्रमांक सुरु करण्यात आला आहे. किंवा नागरिकांनी ऑनलाईन तक्रार करण्यासाठी https://forms.gle/6ozwfU5u76zah2eG6 लिंकवर तक्रार नोंदवावी, असे राजय उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे






