कारंजा-शेलूबाजार दरम्यानची वाहतूक  २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने

0
10

कारंजा-मंगरूळपीर-शेलूबाजार मार्गाने होणार वाहतूक

वाशिम, दि. २१ (दिपक भारूका) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ सी वरील कारंजा-तऱ्हाळा-शेलूबाजार या मूळ मार्गावरील वाहतूक २२ जुलै २०२१ रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कारंजा -मंगरूळपीर- शेलूबाजार या मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, २१ जुलै रोजी जारी केले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ सी च्या देखरेखीचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अंतर्गत मौजे तऱ्हाळा येथे करण्यात येणाऱ्या कामामुळे येथील वाहतूक २२ जुलै रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे पत्र भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यान्वयन इकाई-औरंगाबाद कार्यालयामार्फत देण्यात आले होते. त्यानुसार कारंजा-तऱ्हाळा-शेलूबाजार या मूळ मार्गावरील वाहतूक २२ जुलै रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कारंजा-मंगरूळपीर- शेलूबाजार या मार्गाने वळविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here