ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची धान खरेदी होणार

0
13

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची अन्न व नागरी पुरवठा सचिवांशी चर्चा

भंडारा: पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते, देशातील ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात धानाची लागवड होते त्यामध्ये पूर्व विदर्भ देखील येतो. धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात या भागात होते आणि शेतकऱ्यांनी घेतलेल्या उत्पादनाची शासकीय स्तरावरून खरेदी करण्यात येते.

धान खरेदीचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असून यासाठी काही दिवसांपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र काही कारणास्तव ऑनलाईन नोंदणी होऊन जी मुदत देण्यात आली होती म्हणजे 15 जुलै या तारखेपर्यंत देखील काही शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आलेले नव्हते. मात्र त्यांची पूर्वीच दिलेल्या कालावधीत नोंदणी झाली होती. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांची अन्न व नागरी पुरवठा सचिवांशी चर्चा झाली आणि त्यानंतर शासनस्तरावरून किती शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली मात्र प्रत्यक्षात धान खरेदी होऊ शकली नाही यासंबंधीची माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मागवण्यात आली आहे तसेच यावर लवकरच सकारात्मक तोडगा निघून लवकरच धान खरेदीला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंतेचे राहू नये, शेतकरी हा या देशाचा पोशिंदा आहे त्यामुळे त्याच्याबद्दल सकारात्मकच निर्णय घेण्यात येईल असे सुद्धा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here