वाशिम: नगरपरिषदेच्या गिरनारी कॉम्प्लेक्सच्या दुकानांत पाणी शिरले,व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

0
8

वाशिम दि 29 जून (दीपक भारुका): वाशिम मध्ये झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने प्रशासनाची पोल उघडली आहे त्यांची अकार्यक्षमता समोर आली आहे,वाशिम जिल्हात ठिकठिकाणी पाणी साचले असून यामुळे स्थानिक नागरिक आणि येणारे जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे

वाशिम शहरात शिवाजी चौक स्थित नगर परिषदेचे गिरनारी कॉम्प्लेक्स आहे,या कॉम्प्लेक्समध्ये छोटे-मोठे व्यापारी व्यापार करून आपली उपजीविका चालवतात, पावसाळ्यात येथे पाणी साचत असून व्यापार करण्यास त्यांना अडचणी येतात यासंदर्भात त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आधीच लॉकडाउनमुळे हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे

अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत व्यापाऱ्यांनी लवकरच यावर उपाययोजना न केल्यास उपोषणाचा पवित्रा घेण्याची तैयारी मायभूमी न्यूज शी बोलताना दर्शवली आहे

त्यांनी पुढे असेही सांगितले की या सर्व नुकसानाची जबाबदारी नगरपरिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांची आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here