लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे क्रूझर पलटले,2 ठार,9 जखमी

0
10

चंद्रपूर दिनांक 23 मई ( प्रतिनिधी)

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे क्रूझर वाहन उलटल्याने दोन ठार तर नऊ जण जखमी झाले. ही घटना रविवारी (23 मे) चिमूर तालुक्यातील भिसी -आंबोली मार्गावर पुयारदंड गावाजवळ घडली.

चिमूर तालुक्यातील भिसी येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन क्रूझर (एमएच ३२ एएच ०९५७) वाहन आंबोलीकडे जात होते. पुयारदंड गावाजवळ आले असता वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले.

यात दोघांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले. वाहनचालक अमोल किसन वाघ (वय २७) रा. भिसी, गार्गी संजय मानकर (वय ४), लक्ष्मण गायकवाड ( वय ६७) , स्वाती मानकर (वय २१), शांता दडमल (वय ४९) , ज्योत्स्ना मानकर ( वय ३७), नीळकंठ जांभुळे (५७), भगवान गुडधे (वय ७०) सर्व रा.आंबोली अशी जखमींची नावे आहेत.

जखमींना भिसी येथील प्रा. आ. केंद्रात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here