यवतमाळच्या घुग्घुस वणी रोडवर ट्रकने 5 मजुरांना चिरडले, 2 जागीच ठार

0
15

यवतमाळ दिनांक 4 मे (प्रतिनिधी)

यवतमाळच्या घुग्घुस वणी मार्गावर भरधाव ट्रकने (Truck Accident) 5 मजुरांना (Worker Death) चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या भीषण अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर ( Injured) जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ivrcl कंपनीचे डागडुजीच काम या रोडवर सुरू आहे, पुनवट गावाजवळ भरधाव ट्रकने 5 जणांना चिरडल्याचा हा प्रकार समोर आल्याने आता या परिसरात खळबळ माजली आहे.

गेल्या काही दिवसात रस्ते अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यावरील भरधाव वेग अनेकदा वाहचालकांना तसेच इतरांना नडतो आहे. वेगाच्या नादात अनेक भलतेच प्रकार घडत आहे. आणि अनेकांच्या जीवावर बेतत आहे. यावेळी रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या जीवावर हा प्रसंग ओढावला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळला आहे.

पुनवट गावाजवळ चार वाजताचा सुमारास भिषण अपघात घडला. घुग्घूसपासून अवघ्या पाच कि.मी.अंतररावर घडलेल्या अपघातात भरधाव येणाऱ्या ट्रकने IVRCL कंपनीचा पाच मजूरांना चिरडले. महादेव बालवटकर ( बेलोरा ), राजू मिलमिले ( मारेगाव ) असे मृतकांची नावे आहेत. सूरेश जूनघरी, सतीश गेडाम आणि परत एक मजूर गंभीररीत्या जखमी झालेत.

जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. ही घटना आज चार वाजताचा दरम्यान घडली. या वाढलेल्या अपघाताच्या घटना आता चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. हे अपघात रोखण्याचं आणि रोडवर सुरक्षेचं वातावरण तयार करण्याचं आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here