नागपूर दिनांक 4 मे ( प्रतिनिधी)
वाहतूक परिमंडळ इंदोरा हद्दीतील नागपूर ते सावनेर रोडवरील कोराडी मंदिर समोरील उड्डाणपुलाचे उजव्या बाजूचे सर्विस रोडचे बांधकाम मे. द्रिष्टी स्ट्रक्चलर इंजिनीअरींग प्रा.लि. कडून तीन महिन्याचे आत पूर्ण करण्यात येणार असून सिमेंट रोड बांधकाम दरम्यान वाहतूकीस अडथडा होऊ नये.
या मार्गावर दिवस व रात्रभर व्यस्त वाहतूक असते. त्यासाठी नमूद कामाचे दरम्यान वाहतूकीचे नियमन व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रस्त्यावर वाहतूकीची कोंडी निर्माण होवू नये तसेच रोडवर गंभीर व प्राणांतिक अपघात होवू नयेत, त्यावर प्रतिबंध व्हावा. या दरम्यान रोडवर वाहतूकीचे दृष्टीकोनातून अधिसूचना निर्गमित केली आहे. ही अधिसूचना 29 मे 2022 पर्यंत अंमलात राहील.
नागपूर ते सावनेर रोड वरील कोराडी मंदिर समोरील उड्डाणपुलाचे उजव्या बाजूचे सर्विस रोडचे बांधकाम करीत असतांना याप्रमाणे वाहतूक वळविण्यात आली आहे.
नागपूर ते सावनेर रोडवरील कोराडी मंदिर मेनगेट समोरील उड्डाणपुलाचे उजव्या बाजूचे सर्विस रोड बांधकाम दरम्यान या मार्गावरील वाहतूक रोडच्या डाव्या बाजूने दुतर्फा जाईल.
नागपूर शहरातील सर्व वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करुन आपली होणारी गैरसोय टाळावी व पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर शहर पोलीस उपायुक्त, वाहतूक यांनी केले आहे.






