नागपूर, दि. 18 एप्रिल ( प्रतिनिधी)
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 23 एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शहरातील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) नवीन कॅम्पसचे उद्घाटन करणार आहेत.
दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे :
राष्ट्रपतींचे शनिवार, दि. 23 एप्रिलला दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावर विशेष विमानाने आगमन. त्यानंतर राजभवन येथे राखीव. सायंकाळी 5 वाजता भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या कायमस्वरुपी कॅम्पसचे राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते उद्घाटन. रात्री राजभवनात मुक्काम.
रविवार, दि. 24 एप्रिलला दुपारी 1.30 वाजता नागपूर विमानतळावरुन नांदेड विमानतळाकडे प्रयाण. त्यानंतर दुपारी 4 वाजता उदगीर (जि. लातूर) येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थिती.






