नितीन गडकरी राज ठाकरेला भेटायला शिवतीर्थवर, अर्धा तास पेक्षा जास्त चर्चा

0
16

महाराष्ट्र दिनांक 3 एप्रिल (प्रतिनिधी)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) दाखल झाले आहेत. नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या घरी भेटीसाठी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ध्या तासापेक्षाही जास्त वेळापासून दोघांत चर्चा सुरू आहे

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या आणि मनसेला भाजपची बी टीम असंही संबोधण्यात आलं. त्यानंतर आज नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here