गडकरींच्या उपस्थितीत होणार रेल्वे माल गोदाम श्रमिकांचे अधिवेशन व पंजीकरण समारोह

0
18

नागपूर दिनांक 1 एप्रिल (शहर प्रतिनीधी)

भारतीय रेल्वे माल गोदाम श्रमिक संघ मागील सन १९९८ पासून रेल्वे माल गोदाम श्रमिकांच्या हक्क व अधिकारासाठी लढत आहे. या अस्थायी श्रमिकांना न्याय मिळावा म्हणून संपूर्ण भारत देशात भारतीय रेल्वे माल गोदाम श्रमिक संघाच्या वतीने श्रमिकांसाठी नोंदणी शिबीराचे आयोजन सर्व राज्यात करण्यात येत आहे हे विशेष.

त्याच अनुशंगाने श्रमिकांना केंद्रीय योजनेतून १३ प्रकारच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात हा या अधिवेशन व पंजीकरण शिबीराचा उद्देश आहे. यासाठी संपूर्ण राज्यात या संघाचे प्रतिनिधी सातत्याने कार्यरत आहेत. रेल्वे मंत्रालय व श्रम मंत्रालय यांचे सोबत आमच्या संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अस्थायी श्रमिकांना स्थायी करण्याबाबत सोबतच त्यांची व त्यांच्या कुटुंबाची सुरक्षेची, निवाऱ्याची व उदर निर्वाहाची जबाबदारी पार पाडण्यासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी मदत भारतीय रेल्वे माल गोदाम श्रमिक संघाच्या नैतृत्वात देण्याचा आमचा मानस आहे.

सर्व राज्यात या श्रमिकांची नोंदणी रेल्वे व श्रम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडतआहे. त्याच माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यात नागपूर या ठिकाणी या श्रमिकांचे अधिवेशन व पंजीकरण समारोह नितिन गडकरी, केंद्रीय उडीयन मंत्री,  जगदंबीका पाल, पूर्व मुख्यमंत्री तथा खासदार (उत्तर प्रदेश), मनोरंजन कुमार, राष्ट्रीय प्रभारी भारतीय रेल्वे माल गोदाम श्रमिक संघ यांचे उपस्थितीत पार पडणार आहे.

या समारोहाचे आयोजन अभिषेक वर्मा-प्रभारी महाराष्ट्र आणि गुजरात, शैलेन्द्र पाटील संयोजक व प्रभारी महाराष्ट्र आणि गुजरात, विलास कांबळे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, डॉ. प्रवेश यादव संघटक, नागपूर डिव्हीजन, राजेश यादव-शहर संघटक नागपूर माल गोदाम यांनी केले असून महाराष्ट्रातील सर्व असंघटीत कामगारांनी या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here